Thursday, July 28, 2011

रिश्ते बनते है, बडे धीरे से .......

http://www.youtube.com/watch?v=Ih68T3iU2SU

रिश्ते बनते है, बडे धीरे से, बनने देते
कच्चे लम्हे को जरा शाख पे पकने देते .....

गुलजार साहेब , तुम्ही ग्रेट आहात. हि लोकं कशी बरोब्बर आपली नस ओळखतात आणि आपल्या भावना शब्दांकित करतात....
आपण खरच प्रत्येक नात्याला उलगडण्यासाठी योग्य तो वेळ दिलाच पाहिजे..... खास करून ती नाती , जी आपण स्वतः तयार करत असतो..... नवरा-बायको, मित्र, मैत्रिणी....
आता या गाण्या मध्ये पण एक गम्मत आहे, कोणताही नात उलगडण्या साठी जसा वेळ दिला पाहिजे, तसाच त्या नात्या साठी आपण सुद्धा वेळ दिला पाहिजे, नाही का?.....हा विचार मला सुद्धा आत्ताच सुचलाय. पण खरच, होत कस, आपण एखाद्या व्यक्ती साठी आपला वेळ देतो, पण काही कालावधी नंतर आपल्याला अस वाटत कि अरे, आपण इतका वेळ देतोय, पण आपल्याला हवे तसे काही हे बंध तयार नाही झाले, त्यावेळी हे लक्षात घेतलं पाहिजे, कि हे बंध तयार होण्यासाठी जो काही कालावधी जायला हवा, तो जायलाच हवा .....
असुदे, तत्वज्ञान फार होतय....पण हे गाण ऐका , खूप सुंदर गाणं आहे... for that matter, 'दिल पडोसी है ' मधली सगळीच गाणी खूप सुंदर आहेत, म्हणजे आज २३ वर्षानंतर सुद्धा य गाण्यांची गोडी अवीट आहे.


No comments:

Post a Comment